जीवनातील दाब:
जीवनातील दाब: विज्ञानापासून मनाच्या शांतीपर्यंतचा प्रवास आज गॅसवर भाकरी छान फुगलेली बघून मनात एक स्वाभाविक आनंद झाला. तशीच चपाती फुगलेली बघूनही आपल्याला तृप्ती मिळते. हे फुगणे अन्नाच्या परिपूर्णतेचे लक्षण आहे. 'फुगणे' या प्रक्रियेशी आपले नाते बालपणापासून असते. रंगीबेरंगी फुगा फुगवताना मिळणाऱ्या आनंदाने आपले बालपण रमणीय बनते. आजही समुद्रकिनाऱ्यावर हवेत तरंगणाऱ्या फुग्यांना (बलून्सना) टांगून ठेवणे आणि त्यांना बघणे हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता खेळ झाला आहे. मात्र, 'फुगणे' या शब्दाचे अर्थ परिस्थितीनुसार बदलत जातात. लहानपणी मनासारखे काही घडले नाही की मुलं गाल फुगवून बसतात, ज्याला आपण रुसणे म्हणतो. पण हेच फुगणे जेव्हा अहंकाराचे रूप घेते, तेव्हा ते विनाशाचे कारण ठरते. फुग्यात हवा भरली की अति दाबाने तो जसा फुटतो, तसेच गर्वाने फुगल्यामुळेही त्या व्यक्तीचा अध:पात होतो. म्हणूनच माणसाचे पाय नेहमी जमिनीवर असावेत असे म्हणतात ते उगीच नाही. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर हा 'दाब' (Pressure) अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण पृथ्वीवर वावरताना आपल्या शरीरावर दर चौरस ...